प्रमुख निर्णय : एसटी महामंडळात 14.95% भाडेवाढ, रिक्षा आणि टॅक्सी भाडेही वाढणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देण्यात आलेल्या भाडेवाडीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार, आजपासून एसटी बसची भाडेवाढ लागू होईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे राज्यभरातील गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत तिकीट भाड्यात 14.95% ची वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. या दरवाढीच्या निर्णयानंतर, अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. यामध्ये रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाडीचा मुद्दाही उपस्थित झाला, परंतु त्याबद्दल स्पष्ट माहिती अद्याप दिली नाही.
👉👉 हे देखील वाचा : Bhandara आयुध निर्माण कंपनीत पुन्हा दुर्घटना; आठवड्यातील दुसरा मोठा स्फोट
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची बैठक पार पडली. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. मुख्यत: गृह व अर्थ खात्याचे प्रधान सचिव या बैठकीत उपस्थित असतात. या बैठकीत एसटीच्या प्रलंबित भाडेवाढीचा निर्णय घेतला गेला. ही भाडेवाढ 14.95% इतकी असेल, असे सरनाईक यांनी सांगितले. रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होईल, आणि या वाढीची रक्कम 3 रुपये इतकी असू शकते.
सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत डिझेल, सीएनजी, एसटीच्या सुट्या पार्ट्सच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. तथापि, मागील तीन वर्षांपासून ही दरवाढ झाली नव्हती, असा उल्लेखही त्यांनी केला.
👉👉 हे देखील वाचा : महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार?
सामान्य प्रवाशांवर होणारा परिणाम पाहता, एसटी महामंडळाच्या प्रस्तावानुसार, भाडेवाढ 14.95% इतकी असणार आहे. याचप्रमाणे, ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांची दरवाढ करण्याची मागणी केली होती. यामुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपये ते 26 रुपये होऊ शकते, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये ते 31 रुपये होण्याची शक्यता आहे.
ताज्या दरवाढीच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, तसेच सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती हे मुख्य कारणे म्हणून दर्शविली गेली. यामुळे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेणे अनिवार्य होते, असे एसटी महामंडळाने सांगितले.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.