Thursday, December 11, 2025 12:51:46 PM

Delhi Election Results 2025: आपच्या पराभवाची कारणं कोणती?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली.

delhi election results 2025 आपच्या पराभवाची कारणं कोणती

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली. यात अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला त्यामुळे आपला मोठा धक्का बसलाय. 27 वर्षानंतर भाजपने दिल्लीची सत्ता काबीज करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या निकालादरम्यान, ‘आप’साठी एक धक्कादायक निकाल आला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नेमकं या पराभवाची कारण काय पाहुयात: 

हेही वाचा: पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

आपच्या पराभवाची कारणं कोणती?
1.दिल्लीतील कथित मद्य घोटाळा 'आप'ला महागात पडल्याची चर्चा
2.सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजपा यशस्वी
3.INDIA आघाडीचे नेते प्रचारात कुठेच दिसले नाहीत
4.शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादवांनी 'आप'ला पाठिंबा दिला होता
5.मात्र 'आप'च्या प्रचाराला इंडिया आघाडीतील कोणताही दिग्गज नव्हता
6.काँग्रेससोबत केजरीवालांनी आघाडी न केल्याचा फटका देखील फटका
7.भाजपचं सूक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले
8.भाजपानं ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या
9.मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी
10.आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं
11.प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी आपनं काहीच केलं नाही, यामुळे फटका

हेही वाचा: जरांगेचं पुन्हा साखळी उपोषण

दरम्यान या पराभवनानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिलीय.  'आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्ण विनम्रतेने स्विकारत आहोत. मी भारतीय जनता पार्टीचे विजयाबद्दल अभिनंदन करु इच्छितो. दिल्लीच्या जनतेने ज्या आशा आणि अपेक्षा ठेवून त्यांना बहुमत दिले आहे, त्या ते पूर्ण करतील अशी मला आशा आहे.'

'मागील दहा वर्षात जनतेने आम्हाला संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही अनेक विकास कामे केली. खास करुन शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. लोकांना दिलासा देण्याचा आम्ही अनेक मार्गांनी प्रयत्न केला. दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला', असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले. 


 


mulund-golf-course-proposal-bmc-approval
BMC New Project: मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा कायापालट? गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी बीएमसीची सशर्त मंजुरी

बायोमायनिंग प्रकल्पात 58 लाख टन कचरा हटवला असून उरलेला कचरा पुढील वर्षभरात संपेल. नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Akshaykumar Bankar

bmc new project मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा कायापालट गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी बीएमसीची सशर्त मंजुरी

मुंबईतील मुलुंड डंपिंग ग्राऊंड अनेक वर्षे कचऱ्याच्या डोंगरांमुळे ओळखले जात होते. आता हा परिसर हळूहळू स्वच्छ होत असताना त्याच्या भविष्यासंदर्भात नवे पर्याय समोर येऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील व्यावसायिक गोल्फ खेळाडूंच्या प्रमुख संस्थेने म्हणजे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाने Professional Golf Tour of India (PGTI) या विशाल जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडली आहे. या प्रकल्पाबाबत प्राथमिक अभ्यास करण्यासाठी PGTIने मुंबई महानगरपालिकेकडे (The Brihanmumbai Municipal Corporation, BMC) परवानगी मागितली होती. महानगरपालिकेने ही परवानगी दिली असली तरी काही महत्त्वाच्या अटी घालूनच मंजुरी प्रदान केली आहे.

अभ्यासदरम्यान निर्माण होणारा कचरा किंवा मलबा PGTIने स्वतः योग्य पद्धतीने व्यवस्थापित करावा, तसेच हा कचरा कोणत्याही सार्वजनिक किंवा नागरी भूखंडावर टाकता कामा नये, अशी स्पष्ट अट बीएमसीने मांडली आहे. या निर्णयाची माहिती अधिकृतरित्या बुधवारी देण्यात आली. नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, ही मंजुरी फक्त व्यवहार्यता तपासणीपुरती मर्यादित असून कोणत्याही बांधकाम किंवा विकासकामासाठी ही अंतिम परवानगी मानली जाणार नाही. बायो मायनिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे सुमारे 731 कोटी रुपयांच्या खर्चातून कचरा विल्हेवाटीचे काम सुरु आहे.

हेही वाचा: Mumbai Crypto Fraud: यूएसडीपी करन्सीचे आमिष आणि लाखोंचा गंडा; मुंबईत मोठा क्रिप्टो घोटाळा उघड

या प्रकल्पामध्ये कोणताही अडथळा न येण्यासाठी PGTIने अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे बीएमसीने बजावले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “डंपिंग ग्राऊंडच्या आत व्यवहार्यता अभ्यास करण्यापलीकडे कोणत्याही प्रकारच्या विकासाची मुभा या परवानगीत नाही. पुढील कोणत्याही बांधकामासाठी स्वतंत्र प्रस्ताव आणि मंजुरी आवश्यक असेल.”

2019 पासून सुरू असलेल्या बायोमायनिंग प्रकल्पात आतापर्यंत जवळपास 58 लाख टन कचरा प्रक्रिया करून हटवण्यात आला आहे. एकूण 78 लाख टन कचऱ्यापैकी शिल्लक असलेला कचरा पुढील एका वर्षात पूर्णपणे व्यवस्थापित होईल, असा अंदाज आहे. कचरा हटविल्यानंतर जवळपास 64 एकर मोकळी जमीन उपलब्ध होईल आणि या जागेचा उपयोग गोल्फ कोर्ससाठी करण्याची PGTIची इच्छा अधिक दृढ झाली आहे.

या प्रस्तावाचे मुलुंडमधील अनेक नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी स्वागत केले आहे. डंपिंग ग्राऊंडच्या दुर्गंधी, प्रदूषण आणि धोक्यापासून मुक्त होत असलेल्या या जागेचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो, यामुळे नागरिकांमध्येही आशावाद निर्माण झाला आहे. पुढील काही महिन्यांत PGTIचा सविस्तर अभ्यास अहवाल तयार होणार असून, त्यानंतरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?