Wed. Jun 23rd, 2021

महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल समज-गैरसमज

स्तनाचा कर्करोगाचा प्रकार हा जगभरातील स्त्रियांना होणारा सर्वाधिक कर्करोग आहे. अलीकडे स्तनाच्या कर्करोगात वाढ होऊ लागली आहे. या कर्करोगाबद्दल महिलांमध्ये पुरेशी जागरूकता निर्माण झालेली आहे. परंत, तरीही अनेकदा संकोच, भिती, अज्ञान व अशिक्षितपणा यामुळे स्तन कर्करोगाबाबतचे गैरसमज यामुळे भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत न होता उशीरा होते. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने आजार बळावतो. म्हणूनच स्तनाच्य कर्करोगाबाबत गैरसमजूती दूर होणं गरजेचं आहे. जेणंकरून लवकर निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो.

१) महिलेला कर्करोग होण्यामागे अनुवाशिंक घटक कारणीभूत ठरतात का?
तथ्यः- कुटूंबात एखाद्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग असल्यास अन्य महिलेला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. परंतु, कर्करोग होण्याचे प्रमाण केवळ ५ टक्के इतकेच आहे. ककरोगाबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, काही स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा कोणताही कौटुंबिक इतिहास नसताना सुद्धा कर्करोग झालेला आहे.

२) केवळ वृद्ध महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत?
तथ्यः हे मुळीच खरे नाही. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका हा सर्वांधिक असतो. याशिवाय सध्या तरुण मुलीनांही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. सध्या, स्तनाचा कर्करोग सामान्यत: ५० वर्षांखालील तरुण स्त्रियांमध्ये दिसून येतो. म्हणूनच, प्रत्येक वयोगटातील महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

३) स्तनात वेदना म्हणजे स्तनाचा कर्करोग?
तथ्यः हे मुळीच खरे नाही. सध्या बऱ्याच स्त्रियांमध्ये स्तनात वेदना जाणवते. मासिक पाळी संपल्यानंतर ही वेदना नाहीशी होऊ शकते. स्तनातून स्त्राव निघत असल्यास स्तनाचा संसर्ग देखील होऊ शकतो. परंतु, अनेक महिला स्तनाच्या वेदनेकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न मिळाल्यास आजार बळावू शकतो. म्हणूनच महिलांनी स्तनात वेदना जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४) डीओडोरंट्स आणि अंडर-वायर ब्रा च्या वापरामुळे स्तन कर्करोगास आमंत्रित मिळते?
तथ्यः यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नसून हा केवळ गैरसमज समाजात पसरला आहे. डीओडोरंट्स आणि अंडर-वायर ब्रा च्या वापरामुळे स्तन कर्करोग होत नाही. हे चुकीचे मत आहे की डीओडोरंट्समध्ये असलेले हानिकारक रसायने स्तनामध्ये असलेल्या पेशींमध्ये पसरतात ज्यामुळे कर्करोग होतो. शिवाय, अंडर-वायर ब्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो. परंतु, याबद्दल अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेले नाही. त्यामुळे स्तनाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो हे जाणून घेतल्याशिवाय चुकीच्या गैरसमजूतींकडे लक्ष देणं योग्य नाही.

५) मॅमोग्राफी अतिशय वेदनादायक आणि असुरक्षित आहेत?
तथ्यः हे मुळीच खरे नाही. मॅमोग्राफी वेदनाविरहीत आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. चाळीशीतील प्रत्येक महिलांनी स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी मेमोग्राफी तपासणी करून घेणं गरजेचं आहे. परंतु, हे लक्षात ठेवा की मेमोग्रॉफीमुळे स्तनाचा कर्करोग होतो हा गैरसमज आहे. तसं काहीही होत नाही. त्यामुळे स्तनाची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेमोग्रॉफी करून घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *