Mon. Jul 22nd, 2019

वरातीचा झाला बेरंग, नवरी पळाली boyfriend संगं!

0Shares

झारखंडची राजधानी रांची येथे पार पडलेल्या विवाहात पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवऱ्यावरच रडण्याची वेळ आली. कारण वरात नववधूला घेऊन सासरी निघाली असताना रस्त्यात नवरीच्या प्रियकराने तिला पळवून नेलं.

कसा घडला हा प्रकार?

रांचीमध्ये पार पडलेल्या या विवाहानंतर नव्या नवरीची पाठवणी करण्यात आली.

मात्र ही वरात सासरी जात होती.

त्यावेळी तिचा प्रियकर विधानसभेजवळ या वरातीची वाट पाहत दबा धरून बसला होती.

वरात या भागात पोहोचताच प्रियकर आणि त्याचे साथीदार वरातीत घुसले.

नवरीच्या प्रियकराने कार थांबवली.

नवरी कारमधून उतरुन प्रियकराच्या बाईकवर बसून फरार झाली.

नवरदेव आणि सासरकडीलं मंडळींना यावेळी मारहाणही करण्यात आली.

मुलाकडील कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीने आणि तिच्या प्रियकराने पोलीस स्टेशनला येऊन आत्मसमर्पण केलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: