Thu. Jun 20th, 2019

पती नव्हे नणंदेसोबत लग्नाची विधी

0Shares

लग्नावेळी सात जन्माचे वचन देणाऱ्या नवरदेवासोबत नवरी लग्न न करता नवरदेवाच्या बहिणीशी करत असल्याची आश्चर्य करणारी प्रथा गुजरातच्या एका शहरात घडते. गुजरातच्या उदयपूर शहरात आदिवाश्यांमध्ये नवरी नवरदेवाच्या बहिणीशी लग्न करण्याची प्रथा आहे. यामध्ये लग्नाच्या दिवशी नवरदेव आपल्या आईसोबत घरी राहतो आणि त्याची बहीण किंवा अविवाहित महिला नवरीशी लग्न करून तिला घरी आणते.

नेमकी प्रथा काय ?

गुजरातच्या उदयपूर शहरातील आदिवाश्यांमध्ये एक आगळी-वेगळी प्रथा आहे.

या लग्नामध्ये नवरी नवरदेवाशी लग्न करत नाही.

नवरदेवाची बहिण किंवा कुटुंबातील दुसरी अविवाहित महिला नवरीबरोबर सप्तपदी करते.

यावेळी लग्न सुरू असताना नवरदेव आपल्या आईसोबत घरी थांबतो.

नवरदेवाची बहिण सर्व प्रथा पूर्ण करून नवरीला सासरी घेऊन येते.

ही प्रथा मोडण्याच प्रयत्न केल्यावर वाईट घटना घडतं, अडचणींना सामना करावा लागत असल्याचे या गावातील लोकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, नवरदेव शेरवानी घालून घरी थांबतो आणि त्याची बहिण सर्व प्रथा पूर्ण करते.

सुरखेडा, सनाडा आणि अंबल या गावात ही प्रथा स्वीकारली आहे.

त्यामुळे या गावात नवरी मुलाशी लग्न आणि सप्तपदी न करता त्याच्या बहिणीशी करते लग्न.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: