Tue. Nov 24th, 2020

#CSMTBridgeCollapse – प्रशासन यंत्रणांचे ‘पायात पाय’आल्याने दुर्घटना – उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी  सायंकाळी 7.30 च्या सुमारास  गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.तर ३१ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्वचं स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पूल दुर्घटनेवर भाष्य केले आहे.मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण,  बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, नॅशनल हायवे ऍथॉरिटी यांची कामे सुरळीतचं चालू असतात. पण ही कामे अनेक कारणांमुळे थांबतात आणि यामुळे  मुंबईची अवस्था सध्या अशी अवस्था झाली आहे. असं ही त्यांनी आग्रलेखात म्हटलं आहे.

नेमक काय म्हटले आहे अग्रलेखात ?

दीड वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन पूल दुर्घटना, गेल्या वर्षीची अंधेरीतील  रेल्वे पूल दुर्घटना, सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळनं  या प्रत्येक दुर्घटनेनंतर मुंबईतील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

पुलांच्या ऑडिट आणि दुरुस्तीचे सरकारी आदेश निघाले असले तरीही  या कामांत विविध प्रशासन यंत्रणांचे ‘पायात पाय’ आल्याने  मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ बनले आहेत.

अनेकांसाठी मायानगरी , स्वप्ननगरी असणारी मुंबई आता मात्र  ‘मृत्यूची मुंबई’ ठरत आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. त्यात सध्या आग आणि पूल दुर्घटना हे नवे संकट आहे.

मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण,  बिघडलेले शहर नियोजन यामुळे  मुंबईची अवस्था सध्या बिकट झाली आहे.

दोषींविरोधात कठोर कारवाई होईल, मृतांच्या वारसांना आणि जखमींना सरकारतर्फे अर्थसहाय्य दिले जाईल.पण गेलेल्या जिवांचे काय? त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय?

सध्या निवडणुकीचा मोसम असल्याने विरोधी पक्ष या दुर्घटनेचेही राजकारण करतील अशी टिका देखील केली आहे.

मुंबईत एकूण 314 पूल असून त्यापैकी 40 नवीन आणि 274 पूल अत्यंत जुने आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील 125 पादचारी पुलांपैकी 18 पुलांनी कालमर्यादाही ओलांडली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *