Wed. Jun 16th, 2021

‘या’ गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गावकऱ्यांनी बनवला ‘सांकव’

गावकऱ्यांच्या मदतीने शिक्षकांनी ओढ्यावर तयार लाकडी पुल तयार केला आहे. यामुळे विद्यार्थींना शाळेत येण्याच्या मार्ग झाला सोयीस्कर झाला आहे. 

गावकऱ्यांच्या मदतीने शिक्षकांनी ओढ्यावर तयार लाकडी पुल तयार केला आहे. यामुळे विद्यार्थींना शाळेत येण्याच्या मार्ग झाला सोयीस्कर झाला आहे.  औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील बनोटी जिल्हा परिषद केंद्रातील निमचौकी खोरे या शाळेतील पंधरा विद्यार्थी जीव मुठीत घालून ओढापार करुन शाळेत जातात. गेली चार- पाच दिवस सतत चालु असलेला पावसाने ओढे जोरात वाहू लागल्याने विद्यार्थी शाळेत जावू शकत नव्हते.

विद्यार्थीच्या गैरहजरीचे प्रमाण वाढत होते. शिक्षकांच्या लक्षात आल्याने शिक्षक दत्ता देवरे यांनी विद्यार्थ्यांना डि एफ सी(डिझाईन फार चेंज) संदर्भात मार्गदर्शन करुन, गैरहजर राहण्याचे कारण विचारले असता, ओढ्याला पाणी असल्याने शाळेत येता येत नाही असे सांगितले. त्यावर लाकडी सांकवा (लाकडी बांबूचा पुल) तयार करुन बसवण्याचा उपायही विद्यार्थ्यांनीच सांगितला.

शिक्षकांनी तात्पुरती सोय सांगवा बनवन्याची संकल्पना गावकऱ्यांसमोर मांडली असता, शाळेविषयी गावकऱ्याची आत्मीयता असल्याने त्यांनी तात्काळ होकार दिला. शिक्षक, गावकरी, विद्यार्थीनी ओठ्यावरती बांबूपासून लाकडी सांकवा (पुल) तयार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *