आत्मघातकी बॉम्बस्फोटाने हादरलं ब्रिटन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंग्लडमधील मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे.
या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सध्या घटनास्थळावर अनेक रुग्णवाहिका आल्या असून जखमींना सुरक्षित रुग्णालयात नेण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सर्व परिसरात तपासणी सुरु केली असून जागोजागी सुरक्षा वाढवण्यात आली
आहे.
अमेरिकन गायिका अरियाना ग्रँण्डचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार होता. या कार्यक्रमाला 21 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट
झाले आहेत.