Sun. May 16th, 2021

‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ वर ब्रिटिश खासदाराची प्रतिक्रिया… ‘नॉन सेन्स’!

सरदार वल्लभभाई पटेल यांचा 185 मीटर उंचीच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जगातला सर्वांत उंच पुतळा बांधल्याबद्दल एकीकडे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर विरोधक या पुतळ्यावर 2 हजार कोटी खर्च केल्याबद्दल टीका करत आहेत. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही या स्मारकावर टीका होत आहे.

इंग्लंडच्या पार्लमेंटरिअन पीटर बोन यांनी ‘स्टेच्यू ऑफ युनिटी‘वरून भारताची कडक शब्दांत निर्भत्सना केली आहे.

काय आहे त्यांचा आक्षेप?

2012 साली ब्रिटिश करदात्यांच्या पैशांतून 1.17 कोटी पाऊंड्सचा निधी इंग्लंडने भारत सरकारला आर्थिक सहाय्य म्हणून पुरवला होता.

मात्र भारत सरकारने त्यातील 330 दशलक्ष पाऊंड्स 597 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात खर्च केले.

“आमच्याकडून 1.1 बिलियन पाऊंड्सचं सहाय्य घेऊन त्या रक्कमेतील 330 दशलक्ष पाऊंड्स पुतळ्यावर खर्च करणं हा निव्वळ मुर्खपणा आहे.” असं वक्तव्य बोन यांनी केलंय. तसंच भारताला पैसे पुरवायला नको, हेच यातून सिद्ध होतं. त्यांनी त्यांचे पैसे कशावर खर्च करावेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जर त्यांच्याकडे या पुतळ्यासाठी पैसे आहेत, तर नक्कीच त्या देशाला आपण पैसे द्यायला नको, असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

2013 साली 268 मिलियन पाऊंड्सची, 2014 साली 278 मिलीयन पाऊंड्सची आणि 2015 साली 158 दशलक्ष पाऊंड्सची मदत इंग्लंडने भारताला केली. या शिवाय गुजरातमधील तरुणांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी 14,000 पाऊंड्स ची नगद रक्कमही इंग्लंडने गुजरातला दिली होती.

पैसा नेमका गेला कुठे?

इंग्लंडने पुरवलेल्या निधीतील 86,616 पाऊंड्स हृदयविकारग्रस्तांना योगाभ्यासाने फायदा होतो का, याची चाचणी करण्यात खर्च झाले.

1,00,000 पाऊंड्स भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या केम्ब्रिज विद्यापीठाला दिलेल्या भेटीवर खर्च झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *