ब्रिटिश पंतप्रधानांचा भारत दौरा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. बोरिस जॉन्सन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी नवी दिल्लीतील राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहिली. नवी दिल्लीत भारत आणि ब्रिटनदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांचे अप्रतिम स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जॉन्सन दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुजरातला भेट दिली. त्यानंतर आज त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की आमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले आणि मजबूत झाले आहेत.’