Tue. Apr 20th, 2021

जम्मू-काश्मिरच्या सरकारी रुग्णालयांत इंटरनेट सेवा पूर्ववत

कलम 370 रद्द केल्यापासून बंद केलेल्या ब्रॉडबँड (Broadband) तसंच मोबाईल SMS सेवा अखेर जम्मू- काश्मीरच्या (Jammu and Kashmir) रुग्णालयांत पूर्ववत करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून या सेवा बंद होत्या.

जम्मू- काश्मिरमध्ये पुन्हा इंटरनेट सेवा पूर्ववत

31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये SMS सुविधा सुरू करण्यात आली.

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं होतं.

तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात लँडलाइन (landline) , इंटरनेट (internet) आणि एसएमएस (SMS) सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

काही दिवसांनंतर थोडी सवलत देत ही सेवा हळूहळू सुरू करण्यात आली होती.

सुरूवातीला लँडलाइन आणि त्यानंतर पोस्टपेड मोबाईल सेवेला सुरूवात करण्यात आली होती.

आता सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाईलवर SMS सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिली.

नववर्षाच्या सुरूवातीसह हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

संबंधित बातमी- #Article370 : 145 दिवसांनी कारगिलमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत

काश्मीरमध्ये अद्यापही इंटरनेट आणि prepaid मोबाईल सेवा सुरू होणं बाकी आहे.

सध्या या सेवा केव्हा सुरू केल्या जातील याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. सरकार सध्या यावर विचार करत आहे. स्थिती सुधारण्यासाठी लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे.

हळूहळू अन्य सरकारी रूग्णालय (Government Hospital) आणि शाळांमध्येही (School) इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे, असंही कंसल म्हणाले. मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आलेल्या या सेवांमुळे विद्यार्थी, टूर ऑपरेटर्स, व्यापाऱ्यांना फायदा होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *