ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा

खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाईन क्लास सुरू असताना झूम मिटिंग वर अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे . यामुळे आता ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून शिक्षण घेत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांची ही डोकेदुखी वाढली आहे. याबाबत पालकांनी शाळेत तक्रार दिल्यानंतर मुख्यध्यापिकेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.ऑनलाईन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात झुम अॅप चा वापर केला जात आहे.
झूम अॅप द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासदरम्यान महिला शिक्षिका शिकवत असताना चक्क अॅप वर अश्लिल चित्रफित सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही याचा धक्का बसला आहे.
अॅप हॅक करून हे कृत्य केल्या असल्याचं शिक्षकांनी सांगितले असून यासंदर्भात शिक्षकांची सायबर सेलकडे तक्रार केली आहे .
मात्र शिक्षणाचे धडे गिरवण्याच्या काळात जर विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावर अशा चित्रफितीने दुष्परिणाम होत असतील तर हे निश्चितच चुकीचं आहे, त्यामुळे याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे असून असे दुष्कृत्य करणाऱ्या वर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे…