Fri. Jun 21st, 2019

ब्रोकोली सेलेरी सूप

0Shares

ब्रोकोली सेलेरी सूप हा आरोग्यास खूप चांगला आहे. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तर हृदयाशी निगडीत आजार आणि कैंसर सारख्या आजाराला दूर करण्यासही मदत होते. तसेच गर्भवती महिलांनासाठी हा सुप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, कैल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयरन, विटामिन ए, सी चे प्रमाण आढळतात. त्यामूळे आपण या सूपचे सेवन केले पाहिजे. यामूळे आपले आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच मदत करेल.

साहित्य: –

ब्रोकोली – अर्धा किलो

सेलेरी – 4,5 काडया

कांदा – 1 मोठा

बटर – 30 ग्रॅम

मीठ – 2 चमचा

काळी मिरी – 1 चमचा

पाणी – पाऊण कप

कृती:-

  • प्रथम ब्रोकोली आणि सेलेरी धुऊन घेणे. नंतर ते चिरून घ्या.
  • एका पातेल्यात पाणी उकळून घ्यावे. त्यात ब्रोकोली आणि सेलेरी टाकून त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी उकळा.
  • एका तव्यात बटर वितळून घ्या. त्यात कांदा बारीक चिरून ते 3-4 मिनिटे बटरमध्ये परतून घ्या.
  • त्यानंतर बटरवर ब्रोकोली व सेलेरीचे मिश्रण घालून ते नीट शिजवून घ्या.
  • मिश्रण गार झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटा.
  • मग ते मिश्रण पुन्हा पातेल्यात गरम करा.
  • ब्रोकोली सेलेरी सूप गरम किंवा थंडच सर्व्ह करा.

अशा प्रकारे आपला ब्रोकोली सेलेरी सूप तयार.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: