Fri. Aug 12th, 2022

खळबळजनक! घरात घुसून विवाहितेची छेड काढणाऱ्या गुंडाची विवाहितेच्या भावाकडून हत्या

He was found at the crime scene

‘औरत पे हाथ डालनेवाले की उंगलियां नही काटते, काटते है तो गला’ हा डायलॉग ‘बाहुबली 2’ मध्ये तुम्ही पाहिला असेल. मात्र असाच प्रकार नागपूरमध्ये प्रत्यक्षात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या घरी शिरून तिची छेडछाड करणाऱ्या गुंडाची विवाहितेच्या भावाने थेट हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे.

विवाहितेच्या घरासमोर झालेल्या वादानंतर परिसरातच फिरत असलेल्या गुंडाची अखेर विवाहितेच्या लहान भावाने परिसरातील मंदिराच्या आवारातच हत्या केली आणि पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा थरार मध्यरात्री नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरात घडला.

काय घडलं नेमकं?

नागपूरच्या मिनिमाता नगर परिसरातील गुरु घाशीदास गुरुद्वारेचा परिसर खरंतर पूजा, प्रार्थनेसाठी ओळखला जातो.  मात्र 30 जानेवारी रोजी याच परिसरात काल नागपूरच्या गुन्हेगारीचा काळा चेहरा समोर आणणारा दुर्दैवी प्रसंग घडला.

विवाहित बहिणीच्या मागे हात धुवून लागलेल्या गुंडाला वारंवार समजावल्यानंतरही तो ऐकत नसल्यामुळे अवघ्या 19 वर्षीय भावाने बहिणीला छळणाऱ्या गुंडाला ठार केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन चौरासिया नावाचा गुंड मिनिमाता नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेला त्रास द्यायचा.

वारंवार बोलण्याचा प्रयत्न करणं, घरात घुसणं, अश्लील बोलून शरीरसुखाची मागणी करणं असे निर्लज्ज प्रकार तो बिनदिक्कत करत असे.

कोणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही रोशनने दिली होती.

त्यामुळे परिसरात बदनामीच्या भीतीने विवाहितेने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

30 जानेवारी रोजी रात्री गुंड रोशन पुन्हा विवाहितेच्या घरात घुसला. तिचा पदर खेचत छेडछाड करू लागला.

थेट पदरात हात घातल्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने मदतीसाठी आपल्या लहान भावाला हाक मारली.

विवाहितेचा भाऊ आणि गुंड रोशन चौरासिया या दोघांत वाद झाला.

या वादानंतरही रोशन त्या मिनिमाता नगर परिसरातून गेला नाही आणि तिथेच घुटमळत राहिला.

थोड्या वेळानंतर गुरु घाशीदास गुरुद्वारा परिसरात त्याने पुन्हा विवाहितेच्या भावासोबत वाद सुरू केला आणि चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेस हाणामारीत विवाहितेच्या भावाने रागाच्या भरात गुंड रोशन चौरसियाच्या हातून चाकू हिसकावून घेत त्याच्याच चाकूने त्याची हत्या केली.

बहिणीच्या अब्रूसाठी आपल्या हातून हत्या झाली याची कल्पना आल्यानंतर भाऊ पळून गेला नाही. त्याने थेट कळमना पोलीस स्टेशन गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.