Mon. Dec 6th, 2021

अचानक पेटली होती कार… 7 महिन्यांनी झाला गुन्ह्याचा पर्दाफाश!

सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवडला झालेल्या महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. विम्याचे 30 लाख रुपये मिळावेत, यासाठी सख्ख्या भावानेच बहिणीची हत्त्या करून अपघाती मृत्यू असल्याचा बनाव केला. यासंदर्भात पोलीस तपासात उलगडा झाला आहे.

9 सप्टेंबर 2018 रोजी 44 वर्षीय संगीता हिवाळे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र सात महिन्यांनी हा प्रकार आरोपीने रचलेला बनाव असल्याचं उघड झालं.

काय सांगत होता आरोपी भाऊ?

आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे बहीण मनिषा हिवाळे यांना कारने रुग्णालयात नेत होता.

त्यावेळी कारमध्ये संगीता यांचा 15 वर्षीय मुलगा सायमन आणि आई मायाही होत्या.

अर्ध्या वाटेत कारमध्ये बिघाड झाल्यामुळे आपण, सायमन आणि आई गाडीतून खाली उतरलो, असं जॉनने सांगितलं.

तितक्यात कारने पेट घेतला.

आपण बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटातच गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला, असं जॉनने हिंजवडी पोलिसांना सांगितलं होतं.

काय घडलं होतं नेमकं?

आरोपी जॉन आणि संगीता यांचं पैशावरुन भांडण झालं.

रागाच्या भरात त्याने बहिणीचं डोकं जमिनीवर आपटलं.

यावेळी घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं.

त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जॉनने तिला गाडीत बसवलं.

संगीता यांचा मुलगा सायमन आणि आई माया यांनाही जॉनने सोबत घेतलं.

हिंजवडी IT हब पोलिसांनी शनिवारी 40 वर्षीय आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे याला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *