Sun. May 9th, 2021

Work from Home करणाऱ्यांसाठी BSNL चं free internet, ‘अशी’ आहे सुविधा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सर्वत्र जमावबंदी लागू केली आहे. शासकीय कार्यालयांत कर्माचाऱ्यांची उपस्थिती आता ५ टक्क्यांवर आणली आहे. तसंच खासगी कंपन्यांनाही आपल्या कर्माचाऱ्यांना Work From Home ची परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठीच BSNL नवा प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅनचं नावदेखील BSNL ने Work@Home असंच दिलं आहे. याचा फायदा लँडलाईन उपभोक्ते असणाऱ्यांना मोफत असणार आहे.

Work from Home करण्यासाठी कर्मचाऱ्यांना असणाऱ्या इंटरनेटची आवश्यकता लक्षात घेऊन BSNL ने हा प्लॅन सुरू केला आहे. यानुसार BSNL ने आपल्या ग्राहकांना मोफत इंटरनेट दिलं आहे. युजर्सना दररोज ५ GB डेटा १० MBPS च्या स्पीडने उपलब्ध होणार आहे. ज्यांना दिवसाला ५ जीबीपेक्षा जास्त डेटाची आवश्यकता भासत असेल, तरी हरकत नाही. हा डेटा संपल्यावरही इंटरनेट चालू राहिल, मात्र इंटरनेटचा स्पीड १ MBPS  होऊन जाईल. म्हणजेच हा प्लॅन अनलिमिटेड नेट पुरवणारा आहे.

या प्लॅनसाठी ग्राहकाला कोणतेही वेगळे इन्सटॉलेशन चार्जे भरण्याची आवश्यकता नाही. तसंच कोणतेही monthly charges ही भरण्याची गरज नाही. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंगची सुविधा उपलब्ध नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *