Mon. Jul 22nd, 2019

#Budget2019: गायींच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना, 750 कोटींची तरतूद

44Shares

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हंगामी अर्थसंकल्पात गायींच्या संवर्धनासाठी मोठी योजना जाहीर केली आहे.

मोदी सरकार गायींसाठी कामधेनू योजना सुरू करणार आहे. सरकार कामधेनू योजना सुरू करणार आहे. गोमातेच्या सन्मानासाठी मी आणि सरकार कधीच मागे हटणार नाही.

त्यासाठी जे आवश्यक असेल ते केले जाईल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय गोकूळ आयोगाची स्थापनी केली जाईल आणि कामधेनू योजनेवर 750 कोटी रूपये खर्च केले जातील अशी घोषणा पीयूष गोयल यांनी केली.

पशुपालन आणि मत्स पालनासाठीच्या कर्जाच्या व्याजात 2 टक्के सूट मिळेल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

अर्थमंत्री गोयल यांनी शेतकऱ्यांना निराश न करता मोठी घोषणा केली आहे.

 

44Shares

Leave a Reply

%d bloggers like this: