Thu. Apr 2nd, 2020

कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1997 कोटींचा अर्थसंकल्प सादर

कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1997 कोटींचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. शहराचं सौंदर्य वाढवण्याकडे या अर्थसंकल्पात भर देण्यात आलाय.

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात यंदा मालमत्ता कर थकबाकी आणि बांधकाम व्यवसायतली मंदी यामुळे उत्पन्न घटलं आहे.

दुसरीकडे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प यंदा राबवण्यात येणार असून त्यात आधारवाडी डम्पिंग बंद करून तिथे खाडीकिनारा सुशोभित करणं या महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

शिवाय शहरात नवीन उद्यानं विकसित करण्यात येणार असून केडीएटीच्या ताफ्यात यंदा इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. तर शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारणार असल्याचंही प्रशासनाने अर्थसंकल्पात नमूद केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *