Budget2020 : LIC खासगी झाली, पैसे मिळण्याचा भरवसा गेला- छगन भुजबळ

‘अर्थमंत्र्यांनी बजेट चांगलं वाचलं’ अशी प्रतिक्रिया देत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यानंतर मात्र अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलंय. भुजबळांनी अर्थसंकल्पावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
काय विचरलं भुजबळ यांनी?
GDP इतका खाली गेलाय,ते म्हणताय वाढणार. कसा?
LIC आता खाजगी झाली, आता पैसे मिळण्याचा भरवसा गेला
बँक बुडाली तर 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांचे काय ?
गेल्यावेळच्या घोषित स्मार्ट सिटीच्या कामाचं काय झालं? घोषणेनुसार काम कुठं होतंय ?
OBC आणि SC साठी मागे 53,700 कोटी ठेवले मात्र खर्च झाला फक्त 10 टक्के. आता वाढ करून काय उपयोग?
हुरळून जाण्याचं काही काम नाही. यांचा मागचा परफॉर्मन्स चांगला नाही. मोठे आकडे टाकून लोकांना भुलभुलय्या दाखवायचा. शेतकऱ्यांना मदत करायची नाही, आणि बुलेट ट्रेन आणायची असा प्रकार आहे. महाराष्ट्रात कोणी बुलेट ट्रेन मागत नाही. यातून पैसे मिळतील मात्र जमिनी जातील,कर्जाचा डोंगर का वाढवता?
नितीन गडकरी काम करणारे आहेत. मात्र त्यांचंही काम थांबवलं. काम करणाऱ्या मंत्र्यांना सरकार काम करू देत नाही आणि पैसेही देत नाही.
काय करायला हवं होतं?
अर्थसंकल्प धाडसी मांडता आला असता. शेती, रोजगार, विद्यार्थी, शिक्षण याकरीता धाडसी निर्णय घेता आला असता. मात्र या बजेटमध्ये मूळ प्रश्नांवरून दूर नेऊन सरकार फक्त लॉलीपॉप दाखवतंय.
महागाई वाढली आहे. अशावेळी करदात्यांना दिलासा देऊन काय उपयोग? बेरोजगारी वाढली,महागाई वाढली,खर्च करायला पैसे नाही. बाकीच्या बँका बुडतात तशी आता LIC झाली आहे, असा आरोप भुजबळ यांनी केलाय.