Sun. Jun 20th, 2021

#Budget2020 : LIC आणि IDBI मधील मोठा हिस्सा सरकार विकणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसामान्यांना प्राप्तीकरात दिलासा मिळाला आहे. मात्र अर्थमंत्र्यांनी यावेळी केलेल्या एका घोषणेमुळे मात्र शेअर बाजार पार कोसळला.

LIC आणि IDBI बँकेतील सरकारी भागीदारीतील मोठा हिस्सा विकणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

LIC चा नवा इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO)  बाजारात आणला जाणार आहे.

या IPO मधून LIC आणि IDBI बँकेतील आपल्या भागीदारीचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.

वित्त आयोगाने यासंदर्भात शिफारस केली होती. सरकारने या शिफारशी स्वीकारल्या आहेत.

या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. अर्थसंकल्पाच्या वाचनानंतर शेअर बाजार 700 अंकांनी कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *