Wed. Oct 5th, 2022

भारतातील दुग्ध उत्पादन क्षेत्रात चितळेंचं क्रांतिकारक पाऊल

जगभरात दूध उत्पादन क्षेत्रात अमेरिका सर्वात पुढे मानले जाते तर भारतात सर्वाधिक जनावरांची संख्या असूनही दूध उत्पादन क्षेत्रात भारत मागेच आहे.

मात्र यावर मात करण्याच्या उद्देशाने सांगलीच्या चितळे समूहाच्या जीनस व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एबीएस संस्थेच्या वतीने भिलवडी येथे भारतातील दूध उत्पादन क्षेत्राला नवी दिशा देणारा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.

जनुकीय तंत्राच्या आधारे केवळ स्त्री-बीजांच्या वापरातून कृत्रिम रेतन करत जगातील पहिल्या म्हशीचा भिलवडीतील चितळेंच्या ‘ब्रह्मा’ या प्रकल्पात जन्म झाला आहे.

या प्रयोगातून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या म्हशीचे ‘दुर्गा’ असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रयोगातून जन्म झालेल्या म्हशीचे वजन 32 किलो आहे.

या प्रयोगासाठी निवडलेली मुऱ्हा जातीची म्हैस ही अधिक स्निग्धांशाचे दूध देणारी आहे, म्हणून तिची निवड करण्यात आली आहे, या प्रकारच्या कृत्रिम रेतनातून आपण चांगल्या गाई-म्हशींची निर्मिती करू शकू असंही चितळेंनी म्हंटल आहे.

काय आहे हा प्रकल्प?

  • या प्रकल्पाअंतर्गत भारतामध्ये प्रथम जिनोमिकली सिलेक्टड म्हणजे उच्चतम उत्पादन क्षमता असलेल्या वळूंना अमेरिकेतून भारतात आयात करून त्यांच्या ब्रह्मा या बुल सेंटर मध्ये जोपासना करण्यात आली.
  • या महाबली वळूच्या कृत्रिम सिमेन रेतनचा पहिला प्रयोग मुऱ्हा जातीच्या म्हशीवर करण्यात आला, यातून म्हशीला रेडी झाली आहे.
  •  या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे या कृत्रिम रेतनातुन 90 टक्के मादी जातीचा जन्म होतो, ज्यामुळे दुधाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात आपोआप वाढ होणार आहे.
  • याशिवाय या प्रयोगातून जन्माला येणारे कालवडी या अधिकतम दूध उत्पादन देणारे असणार आहेत.

हा प्रयोग भारतातीलच नव्हे तर हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा चितळे बंधूनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.