Wed. May 19th, 2021

‘ही’ म्हैस जाते गावातील सगळ्या अंत्यविधींना!

पाळीव प्राण्यांची विविध वैशिष्ट्यं आपण आत्तापर्यंत पाहिली आहेत. कुठे ‘अण्णा, अण्णा’ म्हणणारा कोंबडा किंवा सांगलीमध्ये मालकाविना दूध घेऊन जाणारा बैल असे अनेक प्राणी आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यातील एक म्हैस आता चर्चेचा विषय ठरतेय. गावात कोणाचाही मृत्यू झाला की ही म्हैस या गवाकऱ्याच्या अंत्यसंस्काराला जाते.

अंत्यसंस्कारांना जाणारी म्हैस!

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील गोर्वधन वामनराव पाटील यांच्याकडे 4 म्हशी आहेत.

त्यापैकी एक ‘राणी’ नावाची म्हैस अवघ्या 4 वर्षांची आहे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून गावात अंत्ययात्रा निघाली, की ही म्हैस अंत्ययात्रेत सहभागी होते.

संपूर्ण अंत्यसंस्कार उरकेपर्यंत स्मशानभूमीत थांबते.

ज्यावेळी गावकरी माघारी परततात, त्यावेळी ती ही त्यांच्यासोबत परत येते.

त्यामुळे गावासह अंत्यविधीला येणाऱ्या पाहुणे मंडळीत ती कुतुहुलाचा विषय बनली आहे.

म्हशीच्या अंगात आत्मा?

वनोजा गावात मृत्यू झाल्यास ही म्हैस अंत्यविधीला जातेय. स्व. शंकरराव पांडुरंगजी राऊत, ग.भा.केसरबाई गोविंदराव राऊत, ग.भा.मानंदाबाई सुखदेवराव राऊत, स्व.महेश सुभाषराव राऊत, स्व.कृष्णा गोवर्धन राऊत, स्व.गुलाबराव विश्राम राऊत, ग.भा.पार्वताबाई ओमकार मुखमाले, ग.भा. सुमनबाई रामकृष्ण राऊत, स्व. बबनराव नारायणराव राऊत, स्व.ह.भ.प.रामदासजी महाराज पुंडकर, स्व.मोहन नारायण चौधरी, स्व.मधुकर श्रीरामजी राऊत, स्व.उद्धवराव हेक्कड या सर्व गावकऱ्यांच्या अंत्यविधीला ही राणी म्हैस न चुकता उपस्थित होती. शेवटपर्यंत थांबून इतर गावकऱ्यांसोबतच परत आली आहे.

त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

या म्हशीच्या अंगात गावातील आत्मा असल्याचं सांगितलं जातंय.

मुक्या जनावराचा माणसांवर असलेला जिव वेगवेगळ्या घटनांतून आत्तापर्यंत पाहायला मिळालाय. मात्र माणूस मरण पावल्यानंतर गणगोतासारखं अंत्ययात्रेत सहभागी होऊन अस्थीविसर्जनालाही हजर राहणारी म्हैस मात्र वेगळंच उदाहरण बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *