दूध काढताना महिलेवर पडली म्हैस, म्हैस जागीच ठार!

राजस्थानातल्या पैटोले या गावात एक विचित्र अपघात घडला आहे. येथे सकाळी आपल्या म्हशीचं दूध काढायला गेलेल्या मोटी देवी या महिलेल्या एका अजब दुर्घटनेचा सामना करावा लागला. म्हशीचं दूध काढत असताना अचानक म्हैस मोटी देवी यांच्या अंगावरच पडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे, तर म्हशीचा मात्र मृत्यू झाला आहे.
म्हशीचं दूध काढत असताना म्हशीला अचानक चक्कर आल्यामुळे म्हैस पडली. मात्र म्हैस मोटी देवी यांच्या अंगावरच अचानक पडल्यामुळे प्रथम मोटी देवी यांना काही समजलंच नाही. त्या घाबरून गेल्या. या अपघातात त्या गंभीर जखमीही झाल्या. मात्र आजारी म्हशीने पुढच्या काही मिनिटांतच प्राण सोडले.
म्हशीचं वजन जास्त असल्यामुळे मोटी देवी यांना म्हशीखालून काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तिला नंतर रुग्णालयात दाखल करम्यात आलं. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र ज्या म्हशीचं दूध काढण्यात येत होतं, ती म्हैस मात्र काही मिनिटांतच जागच्या जागीच गतप्राण झाली.