Wed. Jun 29th, 2022

‘शिवाजी पार्कमध्ये भारतरत्न लता मंगेशकरांचं स्मारक उभारा’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. वयाच्या ९३व्या वर्षी भारतरत्न लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काल सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्कमधील त्या जागेवर लता मंगेशकरांचे स्मारक उभारावे, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी लता दीदींचे स्मारक उभारावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजी पार्कवर त्या जागी गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांची स्मृती कायमस्वरूपी जातं करण्यात यावी अशी विनंती कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या चाहत्यांच्यावतीने करत आहे. तरी, तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारे स्मृतिस्थळ बनवावे. अशी मागणी भाजपा नेते राम कदम यांनी केली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल दादरयेथील शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते, कलाकार उपथिस्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.