किल्ले बनवा महोत्सवातून किल्ल्यांच्या जतनाचा संदेश

पिंपरी-चिंचवडमध्ये किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी सातशे पेक्षा अधिक विद्यार्थांनी किल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या. गडकिल्यांचं संवर्धन आणि रक्षण होणे गरजेचे असल्याचं संदेश विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीतून दिला.
सरकारने गड किल्यांकडे लक्ष द्यावे, किल्ल्यांची डागडुजी करावी असे शिक्षकांकडून आवाहन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण ७ ठिकाणच्या शाळेत आणि मिळेल त्या ठिकाणी किल्ले बनवा या महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. .

पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, सहयोग नगर, पिंपरी, हिंजवडी, दिघी आणि इंद्रायणी नगर येथील काही शाळांमध्ये हा महोत्सव आयोजित केला होता.
या महोत्सवाला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
या चिमुकल्या हातांनी तीन ते चार तास काम करत मातीचे किल्ले हुबेहूब साकारले.
विद्यार्थ्यांची पाठ थोपटून शाबासकी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ ठेवा जपण्याचा मौल्यवान सल्ला ही दिला.
मांगी तुंगी, प्रतापगड, रायगड, मदन गड, विजयदुर्ग, पिंपळा किल्ला, कामण दुर्ग, शिवडी चा किल्ला असे असंख्य किल्ले या महोत्सवात पाहायला मिळाले.
सध्या मोबाईल च्या युगात मातीशी निगडित खेळ नाहीत, मुलांना किल्यांविषयी माहिती व्हावी. त्यांनी मातीचे किल्ले बनवावेत.