Wed. Jan 20th, 2021

बुलडाणातील ‘लखपती’ गणपती !

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

आपण अनेक श्रीमंत गणपतींबद्दल ऐकलं असेल पण बुलडाणामध्ये अश्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, ज्याची किंमत तब्बल 90 लाख रुपये

आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोनं-चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

गेल्या 25 वर्षांपासून या गणेश मूर्तीवर दरवर्षी सोनं आणि चांदीच्या आभूषणात वाढ करण्यात येते.

यावर्षी बाप्पाच्या मूर्तीवर 10 किलो चांदीची आभूषणे चढवण्यात आली आहेत. यावर्षी संपूर्ण आभूषणात 70 किलो चांदी आणि 2 किलो पेक्षा अधिक सोन्याच्या

अलंकारांनी बाप्पाला मढवण्यात आलं आहे. सोन्याचा हार, कानातील कुंडल, बाप्पाचं आसन, उंदिर अशा अलंकारांचा यात समावेश आहे. हे सर्व अलंकार राणा

गणेश मंडळाचे कार्यकर्ते स्वखर्चातून अर्पण करतात.

या मूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाकडून मंडळ परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणूकीत हा बाप्पा सामिल होतो खरा पण गणराजाचे विसर्जन मात्र करण्यात येत नाही.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *