वॉर्डबॉयच करत होते रुग्णांच्या जीवाशी खेळ

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेमडीविसीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या ३ जणांकडून रेमडीविसीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकलं जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात रेमडीविसीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुशंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने बुलडाणा शहरात या इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली.

हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या रुग्णालयाचे वॉर्डबॉय आहेत. या रुग्णालयामध्ये वापरल्या गेलेल्या रेमडीविसीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे ह्या पाण्याने भरलेल्या रेमडीविसीरच्या कुप्या किती जणांना विकल्या आणि त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे याची चौकशी सुरु आहे.

Exit mobile version