केंद्र-राज्य सरकारमधील वाद चिघळण्याची चिन्हं
बुलेट ट्रेन प्रकल्पावरून केंद्र-राज्य सरकारमधील वाद चिघळण्याची चिन्हं आहेत

बुलेट ट्रेन प्रकल्पावरून केंद्र-राज्य सरकारमधील वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्याजवळ म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गेल्या आठवड्यात गुंडाळला होता. त्यामुळे जागा मिळायला उशीर झाला तर फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिले आहेत.
चार महिन्यात ८० टक्के जागा देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलं आहे. जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन दोन्ही राज्यांमध्ये धावेल. जर जागा मिळायला उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत,” असं यादव म्हणाले.