बुरखाबंदीला विरोध नाही, पण घुंघट प्रथाही बंद करा- जावेद अख्तर

श्रीलंकेत साखळी मानवी बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदी घातली आहे. यानंतर भारतातमध्ये बुरखा बंदी घालण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या गोष्टीवर राजकीय वाद देखील सुरू आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बुरखा बंदी सोबत घुंघट प्रथादेखील बंद करा असा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
श्रीलंकेत जो कायदा आला आहे. त्यामध्ये बुरखा परिधान करा पण चेहरा झाकला नसला पाहिजे असा नियम आहे.
हाच कायदा भारतादेखील लागू करण्यात यावा असे अनेकांचे मत आहे.
माझा यासंदर्भात कोणताही विरोध नाही.
पण राजस्थानमध्ये अखेरचे मतदान होण्यापूर्वी सरकारने राजस्थानमधील घुंघट प्रथेवर बंदी घातली असल्याचे घोषित करायला हवं.” असे मत अख्तर यांनी मांडले.
तसंच ते म्हणाले, “घुंघट प्रथेवर बंदी आणि बुरखाबंदी हा कायदा सुरू झाला तर मला आनंदच आहे. श्रीलंकेत राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घातली असली, तरी हा निर्णय महिला सशक्तीकरणासाठी गरजेचा आहे. चेहरा झाकणे हे बंद झाले पाहिजे मग तो बुरखा असो किंवा घुंघट.”
राजस्थानमध्ये मतदानापूर्वी असा निर्णय घेतल्यास त्याचा मतांवर परिणाम निष्चितच होईल. यामुळेच सरकारसाठी असा निर्णय घेणं कठीण आहे. जावेद अख्तर यांनी एक प्रकारे सरकारसाठी आव्हानच उभं केलंय.