Sun. Oct 17th, 2021

नाशिकात भीषण अपघात, बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली

नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

मालेगावातील कळवण रस्त्यावरील मेशी फाटा नजीक अपघात झाला आहे. एका विहिरीत प्रवाशांनी भरलेली बस पडली. बसमध्ये ३०-४० जण असल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. 

विहिरीत पडलेल्या बसच्या खालील बाजूस रिक्षा अडकली असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०-४० प्रवाशी जखमी आहेत. जखमींवर देवळा येथे उपचार सुरु आहेत.

धुळे-कळवण बस मालेगाववरुन कळवणच्या दिशेने जात होती. यावेळेस मेशी फाटा येथे हा अपघात झाला. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या खोल विहिरीमध्ये ही बस कोसळली.

अपघात झालेल्या बसचा क्रमांक एम एच 06  8428 असा आहे.  

अपघाताचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बसखाली रिक्षा अडकल्याची दिली. त्यामुळे मृतांचा तसेच जखमींचा आकडा वाढण्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक मिळताच स्थानिक लोकं मदतीसाठी सरसावले.  घटनास्थळी क्रेन मशीनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *