Mon. Jan 17th, 2022

बस-लॉरी अपघात, 20 जणांचा मृत्यू

खासगी बस आणि लॉरीचा अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूतील अविनाशी येथे हा अपघात झाला. गुरुवारी सकाळच्या वेळेस हा अपघात झाला.

या अपघातामध्ये २० जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर मृतांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहे. जखमी असलेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

खासगी बस बंगळुरुहून कोचीच्या दिशेने निघाली होती. ही खासगी बस प्रवाशांनी भरलेली होती. बस भरधाव वेगात होती. बस वेगात असताना लॉरीवर धडकली. अशी माहिती मिळत आहे.

या अपघातात खासगी बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

दरम्यान चेन्नईमध्ये देखील एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सेटवर अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेते इंडियन २ या सिनेमाचं चित्रिकरण सुरुं होतं. यावेळेस क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला.

या अपघाताची माहिती स्वत: कमल हासन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कमल हासन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवरील अपघात ३ जणांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *