Mon. May 17th, 2021

केस आले, पण प्राण गेले!

आपलं टक्कल लपवण्यासाठी डोक्यावर शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा केस उगवता येतात. अनेक कलाकार वीग लावण्याऐवजी टक्कलावर केसांचं प्रत्यारोपण करतात. त्यांचा हाच पर्याय आता त्यांचे फॅन्सही अमलात आणू लागलेयत. अनेक लोक आपलं टक्कल झाकण्यासाठी, भरघोस केशसंभार राखण्यासाठी केश प्रत्यारोपणाची (Hair transplant) ची शस्त्रक्रिया करून घेतात. मात्र अशीच शस्त्रक्रिया मुंबईतील एका उद्योजकाच्या जीवावर बेतली. श्रावण कुमार चौधरी  असं या 43 वर्षीय उद्योजकाचं नाव आहे. केशरोपणाच्या  प्रकियेदरम्यान आरोग्य सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

टक्कलावर केस उगवण्याची शस्त्रक्रिया बेतली जीवावर!

श्रावण कुमार चौधरी या उद्योजकांनी सौंदर्य टिकवण्यासाठी केशरोपण शस्त्रक्रिया केली.

या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी तब्बल 5 लाख रुपये खर्च केले होते.

श्रावण चौधरी यांची ही शस्त्रक्रिया 15 तासांहून अधिक काळ चालू होती.

या शस्त्रक्रियेत चौधरी यांनी 9,500  हेअर ग्राफ्ट्स इंम्प्लांट करून घेतले होते.

शस्त्रक्रियेनंतर श्रावण यांना अचानक श्वसनाचा त्रास होण्यास सुरूवात झाली.

त्यांच्या चेहऱ्याला, गळ्याला, मानेला आणि घशाला सूज आली.

त्यांना ताबडतोब पवई हिरानंदानी रुग्णालयात दाखल केलं गेलं.

डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरूही केले.

पण चौधरी यांची प्रकृती बिघडतच गेली.

केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 2 दिवसांतच चौधरी यांचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास चौधरी यांचा मृत्यू झाला.

या मृत्यूला ही शास्त्रक्रियाच कारणीभूत असल्याचा आरोप चौधरी यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी करीत आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *