Jaimaharashtra news

चार महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक २१ डिसेंबरला

  धुळे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांसाटी पोटनिवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी दिली आहे.

   राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, धुळे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील निवडणुक विभागांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू असणार आहे. २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहेत. तसेच ५ डिसेंबरला शासकिय रजा असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही. असे ते म्हणाले.

  तसेच नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर असणार आहे. तसेच उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील.

Exit mobile version