परवानगीनेच ‘निकाह’चे फोटो सामायिक केले, मलिकांचे स्पष्टीकरण

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्याचा मुलगा आर्यन खानचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप सुरूच ठेवले आहेत. क्रुझ ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडे यांचा मित्र काशिफ खानला का सोडण्यात आले? असा सवाल मलिकांनी केला आहे. तसेच महिलेचे फोटो सार्वजनिक करण्याबाबत केलेल्या आरोपांवर मलिकांनी स्पष्टीकरण दिले आहे.
समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निकाहाचा फोटो परवानगीनेच जाहीर केल्याचे मलिकांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘रात्री २ च्या सुमारास वानखेडेंच्या निकाहाचे फोटो माझ्याकडे आलो होते. तसेच फोटो पाठवणाऱ्या महिलेने मला हे फोटो सार्वजनिक करण्यास सांगितले. विना परवानगी मी काहिही केलेले नाही.’ त्यामुळे क्रांती रेडकरने केलेल्या आरोपावर मालिकांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मलिकांचे एनसीबीला पत्र
मलिकांनी एनसीबी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. मलिकांनी पत्रात, २६ प्रकरणांचा पुन्हा तपास करून निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच खोटे आरोप करत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी फसवले आहे त्यांना शिक्षा देण्याची मागणी मलिकांनी केली आहे.