Wed. Oct 5th, 2022

सी-१७ विमान रोमानियासाठी रवाना

भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान बुधवारी सकाळी युक्रेनसाठी मदत सामग्री घेऊन रोमानियाला रवाना झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधून सीमा ओलांडून रोमानियामध्ये पोहोचण्यासाठी रुमानियातील भारतीय नागरिकांनाही या विमानाने परत आणण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक विमान पहाटे रोमानियासाठी रवाना झाले.

युक्रेनमधन रोमानियाला पोहचलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी हवाई दलाचे सी-१७ विमान रोमानियाला रवाना झाले आहे. सी-१७ ग्लोबमास्टरने हिंडन एअरबेसवरून रोमानियासाठी उड्डाण केले आहे.

कीवमध्ये एकही भारतीय नाही

भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडले असून उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कीवमध्ये एकही भारतीय नागरिक नसून, तिथून आमच्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याचे हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.