Mon. Dec 6th, 2021

#CAB जावेद अख्तर यांच्या Tweet चा IPS अधिकाऱ्यांकडून समाचार

#CAB विरोधात जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia) विद्यापीठात विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांच्या कारवाईला समाजातील अनेक स्तरांतून विरोध होत आहे. अनेक नामवंत कलाकारांनीही twitter वरून यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. आपल्या मतांविषयी कायमच आग्रही असणारे आणि आपल्या राजकीय भूमिका निर्भीडपणे मांडणारे Bollywood चे सुप्रसिद्ध पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनीही Tweet करून घडल्या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. मात्र त्यांनी Tweetमधून मांडलेल्या तथ्यांवरून एका पोलीस अधिकाऱ्यानेच त्यांना सवाल केला आहे.  

भारतीय कायद्यानुसार कोणत्याही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय पोलीस विद्यापीठाच्या आवारत घुसू शकत नाही, असं आपल्या ट्वीटमध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी म्हटलंय. जामिया मिलियामध्ये विनापरवानगी घुसत पोलिसांनी नवा पायंडा पाडल्यामुळे भविष्यात इतर सगळ्या विद्यापीठांनाही धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

मात्र जावेद अख्तर यांच्या ट्वीटवर IPS अधिकारी संदीप मित्तल यांनी प्रतिक्रिया देत अख्तर यांना टोला लगावला आहे. जावेद अख्तर यांचा उपहासाने ‘कायदेतज्ज्ञ’ असा उल्लेख करत तुम्ही सांगत असलेला कायदा कोणत्या अनुच्छेदातल्या कोणत्या अधिनियमात नमूद केला आहे हे विस्ताराने सांगा म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल असं म्हटलं आहे.

संदीप मित्तल यांच्या या ट्विटलादेखील अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अक्तर यांच्या Tweet ला Retweet केलं जातंय, तसंच संदीप मित्तल यांच्या Tweet ला देखली लाईक्स मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *