Mon. Dec 6th, 2021

कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना दालन वाटप, ‘या’ मंत्र्यांवर अन्याय

राज्यात महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह एकूण 43 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयात कॅबिनचं वाटप करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे पूत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रायलयातील 7 व्या मजल्यावरील 717 क्रमांकाची केबिन दिली आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना 6 व्या मजल्यावरील मुख्य केबिन दिली आहे.

दालन वाटपात राज्यमंत्र्यावर अन्याय करण्यात आला आहे. सहा राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालन देण्यात आलेलं नाही.

शंभूराजे देसाई, दत्ता भरणे, राजेंद्र पाटील, बच्चू कडू, संजय बनसोड आणि प्राजक्त तनपुरे या राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालन देण्यात आलं नाही.

मंत्रालयाऐवजी या 6 राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालन देण्यात आलं आहे.

तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांना मंत्रालयाच्या तळमजल्यावर दालन देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *