Sat. Oct 16th, 2021

पैठण वॉटरग्रीडला मंत्रिमंडळाची मंजुरी

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण वॉटर ग्रीडला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हा पहिली वॉटर ग्रीड असून २८५ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या वॉटर ग्रीडमुळे पैठण शहरासह तालुक्यातील जवळपास १६० गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे.

मात्र मराठवाड्यातील ११ धरणे जलवाहिन्यांनी जोडून पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी पहिल्या टप्प्यात १०५८५ कोटी रुपये खर्च येणार असताना, प्रत्यक्षात २८५ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने विकसित करताना पहिल्या टप्प्यात तीन धरणांपासून सुरू करायची आणि त्यावर एक हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी द्यायची भूमिका मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलं होते. मात्र, प्रत्यक्षात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *