Sun. Jun 20th, 2021

केंद्राचा निर्णय, ई-सिगरेटवर आता बंदी!

केंद्र सरकारने ई-सिगरेटवर (E-Cigarette) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ई-सिगरेटचं उत्पादन आणि विक्री आता बंद करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली.

धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई- सिगरेट्स नापास!

धुम्रपानाची समस्या सुटावी हा ई-सिगरेटमागे मुळ उद्देश होता.

मात्र यमध्ये ई-सिगरेट (E-Cigarette) पूर्णपणे अपयशी ठरलीय.

उलट लहान शालेय मुलांमध्ये ई-सिगरेटचं व्यसन वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळानं E-cigarette वर बंदी घालायला मंजुरी दिलीय.

त्यामुळे आता ई-सिगारेटची निर्मिती, त्याचं उत्पादन, त्याची विक्री, आयात-निर्यात, वितरण, साठवणूक तसंच जाहिरातीवर बंदी आहे.

ई-सिगरेटप्रमाणे ई-हुक्क्यावरही बंदी घालणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय.

शिक्षा-

पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास 3 वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सिगरेटवर बंदी कधी?

खरंतर ई-सिगारेटपेक्षा सिगारेट जास्त अपायकारक असतात आणि त्यांचं धुम्कपान करणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे.

मात्र तरीही अजून सरकारने त्यावर अजून बंदी का घातली नाही, याबद्दल माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारलं होतं.

त्यावेळी ई-सिगारेटचं व्यसन सिगरेटप्रमाणे अजून सर्वत्र पसरलेलं नाही. त्यामुळे ते वाढण्यापूर्वीच त्यावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं उत्तर जावडेकर यांनी दिलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *