Fri. Sep 30th, 2022

अखेर झाला मंत्रिमंडळ विस्तार

राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. सरकार स्थापन होऊन ३९ दिवस झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाबाबत विरोधक टीका करत आहेत. अशामध्ये मंत्री पदाची संधी न मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये अनेक आमदार नाराज असल्याचे म्हटले जात होते. अशामध्ये शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्यामुळे ते नाराज झाले आहेत. अखेरच्या क्षणी संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला असल्यामुळे ते आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. एकूण १८ आमदारांचा आज शपथविधी सोहळा झाला. शिंदे गटातील ९ आमदार आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. याच दरम्यान, शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांचा पत्ता अखेर कट झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचे नाव नाही. कारण मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आमदारांच्या नावाच्या खुर्च्या त्याठिकाणी लावण्यात आल्या होत्या. यामध्ये संजय शिरसाट यांचे नाव खुर्चीवर नव्हते. त्यामुळे संजय शिरसाट हे नाराज झाले

दरम्यान, शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपमधील आमदार गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचे नाव नाही.

3 thoughts on “अखेर झाला मंत्रिमंडळ विस्तार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.