Tue. May 21st, 2019

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

0Shares

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. अखेर या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. 100 कोटींचा निधी मंजूर केल्याने लवकरच पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक उभारलं जाणार आहे. तसंच हा खर्च MMRDA करणार आहे. राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे.

स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला.

100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारण्यात येईल.

23 जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे.

 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार-

स्मारकाचा खर्च 100 कोटी इतका आहे.

पैसे तातडीने MMRDAला सुपूर्द केले जातील.

सर्व परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत.

स्मारकासाठी निविदा काढल्या जातील.

निविदेची प्रक्रिया MMRDAकडून केली जाणार आहे.

एका आठवड्याच्या आत निविदा काढण्यात येतील.

उद्या गणेश पूजनाचा कार्यक्रम असून जागेचे हस्तांतरण होईल.

जागेचे आरक्षण महापौर निवासऐवजी ‘स्मारक’ असे केले जाणार.

BJP साठीही बाळासाहेब श्रद्धेय

“बाळासाहेब ठाकरे हे एकाच पक्षाचे नेते नव्हते. तर  ते सर्व देशाचे नेते होते. भाजपसाठी बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धेयआहेत. युती व्हावी या उद्देशाने स्मारकाचा निधी दिला नाही”, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *