तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे – आदित्य ठाकरे

अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर, तुमची ‘दिशा’ चुकली आहे, असे उत्तर देत आदित्य ठाकरेंनी दिलं. आणि जोरदार हशा पिकला.
आम्हाला मध्ये मध्ये काही काही बातम्या येत असतात. ‘आप कुछ भी बोलो, आपका उत्तर हमे ‘पटणी’ चाहिये,’ असं अवधूत गुप्ते म्हणाले, आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
माझी हिंदी खराब आहे. ‘आप जो उत्तर देंगे वो हमे ‘पटनी’ चाहिये वो उत्तर’, असे अवधूत गुप्ते म्हणाले. यावर तुमची ‘दिशा’ चुकली आहे, असे उत्तर देत आदित्य ठाकरेंनी दिलं. आणि पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.
आई मुलाची जबाबदारी मोठा होण्यापर्यंत घेते. त्यानंतर ती जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे देते.
तर किती वर्ष ही जबाबादारी रश्मीवहिनींनी घ्यायची ? असा सवाल अवधूत गुप्तेने आदित्य ठाकरेंना केला होता.
दरम्यान काही दिवसांआधी अभिनेत्री दिशा पटानी आणि आदित्य ठाकरेंना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यानंतर अनेत चर्चांना उधाण आले होतं.
संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमाला महाविकासआघाडीतील युवा आमदारांची उपस्थिती होती.
यामध्ये कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विश्वजीत कदम, झीशान सिद्दीकी, रोहित पवार आणि धीरज देशमुख आणि ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी या सर्व युवा आमदारांची मुलाखत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली.
यावेळी प्रसिद्ध गायक यांनी आदित्य ठाकरेंची मुलाखत घेतली. यामध्ये अवधूत गुप्तेंनी अनेक गुगली प्रश्न विचारले.
निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा झाला ?
हाऊसमध्ये (सभागृहात) जाण्याची हौस माझीच होती.
राजकारणात सक्रीय झाल्यापासून मी लोकसभा आणि विधानसभेत जाऊन मी अधिवशेनाचं काम पाहिलयं.
घरी असल्यावर मी संसदेचं अधिवशेन टीव्हीवर पाहायचो. ही आवड तुम्हाला असायला हवी. आणि मी आता शिकतोय.
आवड असल्याने मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे घराण्यातून कोणीही निवडणूक लढवली नव्हती. निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा झाला ? असा सवाल अवधूत गुप्तेने केला होता.