Tue. Aug 9th, 2022

‘होय शरद पवार म्हणजेच जाणता राजा…’ जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून उठलेल्या गदारोळानंतर शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव ‘जाणता राजा’ असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव न घेता उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं. मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी ताबडतोब उदयनराजेंना प्रत्युत्तर दिलं.  

काय म्हणाले डॉ. जितेंद्र आव्हाड?

हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय नेता म्हणजेच शरद पवार…

इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, पाणी प्रश्न, शेती प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न प्रश्नांची मालिका सांगा आणि प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांच्याकडे आहे म्हणून ते जाणता राजा आहेत.

उदयनराजे त्यांचा हात पकडून सगळे राजकारणात आले, आता त्यांच्यावर टीका करून हेडलाइलमध्ये आले आहेत म्हणून शरद पवार जाणते राजे आहेत असं आव्हाड यांनी म्हटलंय.

संबंधित बातमी-

Video : ‘पुन्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलाल तर…’, छ. उदयनराजेंचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.