Thu. May 13th, 2021

गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते – यशोमती ठाकूर

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारत्मकता नष्ट होते, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

गोमाता पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने त्या अमरावतीत बोलत होत्या.

‘आपल्यातलं नकारात्मक रसायन असतं, ते गायच्या दर्शनाने, गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नाहीसं होतं. आपल्या संस्कृतीध्ये याबद्दल सांगितलं आहे. ते सगळ विसरुन जातो. आणि निव्वळ राजकारणासाठी राजकारण करतो. म्हणून आपण मागे राहतो’, असेही त्या म्हणाल्या.

यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला समर्थन दिल्याचा आरोप आता सर्वच स्तरातून केला जात आहे.

दरम्यान काही दिवसांआधीच यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रात्रीत लक्ष्मी आली तर येऊ द्यायचं, नाही म्हणायचं नाही.

असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *