Wed. Dec 1st, 2021

3 मेट्रो मार्गांना राजमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

काही महिन्यावरच विधानसभा निवडणुका पार पडणार असून मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत 3 मेट्रो मार्गांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका जवळ असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं जात आहे. या 3 मेट्रोमध्ये गायमुख- शिवाजी चौक (मीरा रोड), वडाळा-सीएसएमटी, कल्याण-डोंबिवली- तळोजा अशा तीन मार्गांवरील मेट्रोंना मंजूरी दिली आहे.

तीन मार्गांवरील मेट्रोंना मंजूरी –

गायमुख- शिवाजी चौक (मीरा रोड), वडाळा-सीएसएमटी, कल्याण-डोंबिवली- तळोजा मेट्रोंना मंजूरी देण्यात आली.

मेट्रो 12 म्हणजे कल्याण- डोंबिवली-तळोजा मार्गावरील मेट्रोला नोव्हेंबर महिन्यात मंजूरी देण्यात आली होती.

या मेट्रोचा मार्ग 20.756 किमी लांबीचा असून 17 स्थानकांचा समावेश असणार आहे.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गिका-१० (४,४७६ कोटी रू., ११.४ किमी).

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मेट्रो मार्गिका-११ (८,७३९ कोटी, १४ किमी).

कल्याण – तळोजा मेट्रो मार्गिका १२ (४,१३२ कोटी रू.,२५ किमी) या तीन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *