तिसरी लाट रोखण्यासाठी मोदी मंत्रिमंडळात चिंतन

तिसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात चिंतन सुरु झालं आहे. कोरोना प्रतिबंधासाठी २३ हजार कोटींचे नवे आर्थिक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. आर्थिक पॅकेजमध्ये केंद्राकडून १५ हजार कोटी तर राज्याकडून ८ हजार कोटींचे योगदान असणार आहे. तर ‘देशात प्रत्येक जिल्ह्यात १० हजार लिटर वैद्यकीय प्राणवायू साठा करावा’ अशी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची अपेक्षा वर्तवली आहे तर ‘मार्च २०२२ पूर्वी नव्या कोरोना प्रतिबंधात्मक पॅकेजची अंमलबजावणी पूर्ण व्हावी’ असं देखील त्यांनी म्हंटल केलं आहे.