Mon. Dec 6th, 2021

महाराष्ट्राला ४ नवे मंत्री, दोघांना डच्चू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लक्षवेधी चेहरे समोर आले आहेत. महाराष्ट्रामधून नारायण राणेंसह भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला आहे. राज्याचे भौगोलिक प्रतिनिधित्व जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रेंना डच्चू देण्यात आला. आगामी मनपा निवडणुका नजरेसमोर ठेवूनही राज्यात मंत्रीपदे अश्या प्रकारे देण्यात आली आहेत:

– राणेंना थेट कॅबिनेट मंत्री करून शिवसेनेला शह
– डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व
– कपिल पाटील यांचे मंत्रीपद मुंबई महानगरात पक्षविस्तारासाठी
– डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून वंजारी प्रतिनिधित्व
– रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड मराठवाड्यातून केंद्रीय मंत्रीपदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले लक्षवेधी चेहरे :

– नारायण राणे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्या राज्यसभा सदस्य
– सर्वानंद सोनोवाल, आसामचे माजी मुख्यमंत्री, सध्या संसद सदस्य नाहीत
– ज्योतिरादित्य सिंदिया, मध्यप्रदेश काँग्रेसचा महत्वाचा चेहरा, गांधी घराण्याशी बंडखोरी करून भाजपात. सिंदिया यांच्या बंडखोरीमुळे मध्यप्रदेशात भाजपाचे सरकार
– राजीव चंद्रशेखर, भाजपाचा उच्च विद्याविभुषित चेहरा. उद्योगपती आणि माध्यम व्यावसायिक म्हणून ओळख, सध्या राज्यसभा सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *