Mon. Jan 17th, 2022

…तर मला फोन करा, अमेय खोपकर यांचं आवाहन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या आवाहनाला व्यापारी संघटनेनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

दुकानं बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतरांचीही काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तसेच तरुणांना उद्देशून हे आवाहन केलं आहे.

हीच गैरसोय टाळण्यासाठी मनसेच्या अमेय खोपकर यांनी पुढाकार घेतला आहे. अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केलं आहे.

काय म्हणाले अमेय खोपकर ?

पुण्यामध्ये कोणी आजी-आजोबा, आजारी तरुण व्यक्तींचा या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. त्यांच्यासाठीच ही पोस्ट लिहिली आहे. तुम्हाला तसेच तुमच्या ओळखीतील आजी आजोबांना, रुग्णांना किराणामाल, औषधं तसंच अगदी जेवण हवं असल्यास मला फोन करा, असं आवाहन अमेय खोपकरांनी केलं आहे.

तसेच मी पुर्ण काळजीपूर्वक मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचा वापर करून तुमच्या दरवाजापर्यंत त्या वस्तू पोहोच करेन, असं आश्वासनही अमेय खोपकर यांनी दिलं आहे. निसंकोच पणे मदतीसाठी कॉल करा, धन्यवाद, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण सुखरूप या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास देखील अमेय खोपकरांनी व्यक्त केला आहे.

अमेय खोपकर यांनी मदतीसाठी काही मोबाईल नंबरदेखील शेअर केले आहे. या नंबरच्या साहाय्याने तुम्ही हवी असलेलं आवश्यक वस्तू मागवू शकता.

दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. याच धर्तीवर मनसैनिकांनी देखील पुढाकार घेतला.

मनसैनिकांनी स्वतःच पुढाकार घेत बस थांबे स्वच्छ केले. याबाबतचे ट्विट मनसेच्या अधिकृत खात्यावरुन करण्यात आलं आहे.

रविवारी २२ मार्चला देशात जनता कर्फ्युचं आवाहन करण्यात आलं आहे. या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *