Wed. Oct 5th, 2022

मास्क वापरण्याचे आवाहन, सक्ती नाही – राजेश टोपे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती असल्याचे वृत्त समोर आलं होत. मात्र, ‘नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन आहे, सक्ती नाही’ असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, राज्यात मास्क वापरण्याचे आवाहन असून सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ न होण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन टोपेंनी दिले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई होणार नसल्याचेही राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

राजेश टोपे म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, पुणे आणि रायगड या शहरांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या पार्श्वभूमीर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याला पत्रक पाठवलं आहे. या पत्रकात राज्यात योग्य खबरदारी घेण्याचे आदेश करण्यात आले आहे. यानुसार राज्यात मास्क वापरण्याचे आवहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे, बस, सिनेमागृह, रुग्णालय, महाविद्यालये याठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहनही टोपेंनी केले आहे. तर कोरोना चाचणी वाढवण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाच्यावतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांन देण्यात आल्या असल्याचे टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.