Wed. Jan 19th, 2022

पाकिस्तानचे मनसुबे फ्लॉप: ‘बिटींग रिट्रीट’ सोहळा होणार नाही

वाघा बॉर्डरवर आज बिटींग रिट्रीट सोहळा होणार नाही. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्य़ा पार्श्वभूमीवर हा  निर्णय घेण्यात आला. अमृतसरचे उपायुक्त शिव दुलर सिंह ढिल्लोन यांनी ही  माहिती दिली आहे. पाकिस्तान अभिनंदन यांची सुटका बिटींग रिट्रीट सोहळ्याच्या वेळेस करून जगाला आपन शांततेचा पुढाकार करत असल्याचे दाखवणार होता. मात्र बिटींग रिट्रीट सोहळा रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे पाण्यात गेले आहेत. अभिनंदन यांच्या सुटकेच्या वेळी  मिडीया आणि सामान्य लोकांना बॉर्डरपासून दूर ठेवण्यात येणार आहे.

अगोदरही झाली होती ‘बिटींग रिट्रीट’ रद्द

भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाक सीमेवर तणाव निर्माण झाला होता.

त्यामुळे 29 स्पटेंबर 2016 ते 02 ऑक्टोबर 2016 या काळात रद्द करण्यात आली होती.

बिटिंग रिट्रीटम्हणजे काय?
ब्रिटनमध्ये 16 व्या शतकात या सोहळ्याची सुरुवात झाली.

सूर्यास्ताच्या वेळी सैनिक युद्धभूमीवरून आपल्या शिबीराकडे रवाना होत त्यावेळी बंदुकीची एक गोळी झाडून, ड्रम, पाईप यांसारखे वाद्य वाजवत हा सोहळा पार पडतात.

वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशाचे झेंडे उतरवले जातात.

यावेळी दोन्ही देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.

यावेळी दोन्ही देशाचे जवान अतिशय उत्साहात बॉर्डरपर्यंत मार्च करतात.

राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन खाली उतरवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *